कालीचरण महाराज विरुद्ध गुन्हा दाखल

अकोला : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या कालीचरण महाराजाविरुद्ध अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्तीसगड राज्यातील रायपुर येथील एका कार्यक्रमात कालीचरण महाराज याने महात्मा गांधी यांच्याविषयी अपशब्दाचा वापर केला होता. याप्रकरणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलना करत महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

अकोला सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला कालीचरण महाराज विरुद्ध भा.द.वि.,कलम 294, 505 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटल्यानंतर विजय वडेट्टीवार, नाना पटोले, नवाब मलिक आदी मंत्र्यांकडून कालीचरण महाराजावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here