नकली लष्करी अधिकारी अटकेत

नाशिक : नाशिक देवळाली कॅम्प परिसरातील स्कूल ऑफ आर्टिलरी भागातून नकली लष्करी अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून लष्कराच्या कॅन्टीनचे कार्ड व लष्करी वाहनावर लावला जाणारा लोगो घेण्यात आला आहे. अटकेतील गणेश पवार या नकली लष्करी अधिका-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश पवार हा चांदवड तालुक्यातील हरसूल येथे राहणारा असल्याचे म्हटले जात आहे. परिसरातील रहिवाशांना त्याचा संशय आला. त्यामुळे या घटनेची माहिती लष्करी अधिका-यांना देण्यात आल्यानंतर त्याला ताब्यात घेत देवळाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here