महिला पोलीस निरीक्षकाची गळफास घेत आत्महत्या

पुणे : पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस निरीक्षकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिल्पा चव्हाण असे आपली जीवना यात्रा संपुष्टात आणलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेने पुणे पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

शिल्पा चव्हाण यांच्याकडे सामाजिक सुरक्षा व एमओबी असा दुहेरी चार्ज होता. ड्युटीची वेळ झाली तरी त्या फोन उचलत नव्हत्या. त्यांच्या घरी गेलेल्या स्टाफने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश मिळवल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here