शेतीच्या वादातून मुलाने केली पित्याची हत्या

जालना : शेतीच्या वादातून मुलाने आपल्या पित्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एलसीबी पथकाच्या तपासात हा प्रकार उघडकीस आला आहे. 4 जानेवारी रोजी पुणेगाव येथील रहिवासी असलेले भाऊसाहेब‎ चव्हाण हे शेतात झोपायला गेले‎ होते. दुस-या दिवशी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. तपासाअंती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मयत भाऊसाहेब चव्हाण यांच्या मुलासह इतर दोघांना अटक केली आहे. अरविंद भाऊसाहेब चव्हाण (35),‎ अनिल अर्जुन अंभोरे (22), सतीष अर्जुन‎ अंभोरे (25) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अरविंद चव्हाण याचे वडील‎ भाऊसाहेब चव्हाण हे मुलगा अरविंद यास शेतजमिनीची विकू देत नव्हते. काही‎ महिन्यांपूर्वी विकलेल्या बैलजोडीचे पैसे त्यांनी दिले नव्हते. यावरून झालेल्या वादातून मुलाने त्यांच्या हत्येचे नियोजन केले होते. भाऊसाहेब‎ चव्हाण शेतात झोपायला गेल्यानंतर मध्यरात्री त्यांचा चाकू व लोखंडी दांड्याने खून करण्यात आला. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक राठोड करत‎ आहेत.‎

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here