गिरीश महाजन यांचा कोरोना लवकर बरा व्हावा – खडसे

On: January 9, 2022 1:35 PM

जळगाव : जळगाव येथील मराठा विद्याप्रसारक संस्थेशी निगडीत अँड. विजय पाटील यांनी कोथरुड – पुणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी पुणे पोलिसांचे पथक जळगावला आले आहे. तपासकामाचा भाग म्हणून या पथकाने काही ठिकाणी छापे घातल्याचे सांगितले जात आहे.

भाजप नेते गिरीश महाजन हे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले जात असून त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे देखील या निमित्ताने म्हटले जात आहे. दरम्यान गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती लवकर बरी होवो असे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे. गिरीश महाजन यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई होणार असल्याचा विश्वास या प्रकरणातील फिर्यादी विजय पाटील यांनी व्यक्त केला आहे. सुरुवातीला हा गुन्हा निंभोरा ता. रावेर येथील पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर पुणे येथे वर्ग करण्यात आला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment