जळगाव : सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याच्या मागणीसाठी आरपीआय आठवले गटाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालासमोर साखळी उपोषण सुरु आहे. रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या आंदोलनात कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी देखील सुरु आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होण्याची मागणी गुप्ता यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व महापालीका आयुक्तांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी जिल्हाधिका-यांनी दिशानिर्देश दिले आहेत. सध्या दिवसा जामाबंदी सुरु आहे. याप्रकरणी पुरावा म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी एका दैनिकात प्रसिद्ध झालेला फोटो देखील जोडला आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई होण्याची मागणी गुप्ता यांनी केली आहे.