शिक्षा भोगून आलेले अडकमोल शिक्षा झालेल्या रेशन दुकानदारांचे शिलेदार : दीपककुमार गुप्ता

RTI Dipak kumar gupta

जळगाव : त्याने चाकूने सपासप वार करून एकाचा मुडदा पाडला. ती केस झाली. प्रकरण पुढे गेल्यावर जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सतावू लागली. त्यांनतर जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या जन्मतारखेच्या कागदपत्रांवर केस आणून ठेवली. अशा प्रकारे कारनामा रचणारे आहेत अनिल अडकमोल. माझ्याऐवजी त्यांनाच हद्दपार करा अशी मागणी माहिती तथा सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे. या महाशयांचे पिताश्री हे देखील एका हत्येच्या गुन्ह्यात होते. तसेच आणखी काही नातेवाईक असल्याच अपराधात गुंतले असल्याने त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड बघता त्यांच्या विरुद्ध प्रशासनाने कारवाई करावी. महाराष्ट्राने देशाच्या प्रशासन सेवेत 1 जून ही अनेकांची जन्म तारीख वादग्रस्त ठरली आहे. अशी तारीख दाखवून अनेक अधिका-यांनी मिळवलेल्या बदल्या, बढत्या सेवानिवृत्तीचे लाभ वादग्रस्त विषय राहीले आहेत.

जेलमध्ये शिक्षा भोगून आलेले अनिल अडकमोल हे शिक्षा झालेल्या रेशन दुकानदारांचे नेतृत्व करत आहेत. ते माझे पोलीस संरक्षण काढून घेण्यासह हद्दपारीची मागणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. त्यांनी आपल्या अंतर्मनात बघून स्वत:च्या चौकशीची मागणी केल्यास योग्य राहील असे जळगाव येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी म्हटले आहे. आज दुपारी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यासह त्यांना हद्दपार करण्याची मागणी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केली आहे. त्या पार्श्वभुमीवर दीपककुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.

पुढे बोलतांना दीपककुमार गुप्ता यांनी म्हटले की आपल्यावर दाखल असलेले गुन्हे न्यायाप्रविष्ठ असून त्यात आपल्याला अद्याप शिक्षा झालेली नाही. मात्र आपल्याविरुद्ध आंदोलन करणारे अनिल अडकमोल हे स्वत:च आरोपीच्या पिंज-यात राहून शिक्षा भोगून आलेले आहेत. त्यांच्या विरुद्ध जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 75/1999 (26/3/1999) भा.द.वि. 302, 147, 148, 149, 120 (बी) गुन्हा दाखल आहे. त्यांचे अगदी जवळचे नातेवाईक देखील जेलमध्ये शिक्षा भोगून आले असल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे. असे असतांना त्यांनी आपल्या हद्दपारीची मागणी करणे म्हणजे एक हास्यास्पद प्रकार आहे. आपल्याविरुद्ध असलेल्या आरोपांची चौकशी व्हावी यासाठी आपण स्वत:च जिल्हाधिकारी, पालकमंत्री व पोलीस प्रमुखांकडे मागणी केली आहे. तशी मागणी स्वत: अडकमोल यांनी देखील करावी आणि नैतिकता जपावी असे आव्हान गुप्ता यांनी माध्यमांसमोर केले आहे. त्याही पलीकडे जाऊन आपण स्वत:च आपली सीबीआय व इन्कम टँक्समार्फत मागणी देखील केली आहे. अनिल अडकमोल यांची दोन रेशन दुकाने आहेत. तसेच काही दुकानांमध्ये त्यांची छुपी भागीदारी असल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे.

शिक्षा भोगून आलेले अनिल अडकमोल शिक्षा झालेल्या रेशन दुकानदारांचे नेतृत्व करत आहेत. आपल्या माध्यमातून 137 रेशन दुकानदारांना शिक्षा झाली आहे. त्यांची ३ हजार रुपये अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यांना 2 ते 10 हजार रुपये दंड झाला आहे. गरिबांचे धान्य घेणा-या दुकानदारांचे ते नेतृत्व करत आहेत. आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे वाळू माफियांवरील दंडात्मक कारवायांमुळे प्रशासनाला करोडो रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. याशिवाय  कितीतरी कामे आपण मार्गी लावले आहेत. अशी एकतरी कामगिरी अनिल अडकमोल यांची आहे काय? असल्यास त्यांनी जनतेला ती दाखवून द्यावी असे आव्हान माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केले आहे. (या केसमध्ये रुची ठेवणा-यांनी या केसची कागदपत्रे हाताळावी, मिळवावी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here