जात विचारुन ग्राहक वकीलास नाकारले घर — अँट्राँसिटीचा गुन्हा दाखल झाला बिल्डरवर!!

औरंगाबाद : ग्राहक म्हणून घर विकत घेण्यासाठी आलेल्या वकिलास त्यांची जात विचारुन घर देण्यास टाळाटाळ करत नकार देणा-या बिल्डरसह इतरांविरुद्ध औरंगाबादच्या चिकलठाणा पोलीस स्टेशनला अँट्राँसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील भाईश्री समुहाचे मकरंद देशपांडे, सोमाणी, जैन (पूर्ण नाव माहिती नाही), तसेच बांधकामावरील कर्मचारी योगेश निमगुळे, सागर गायकवाड व इतर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

औरंगाबाद येथील भाईश्री गृपतर्फे भूमी विश्वबन येथे रो हाऊसची घरे बांधण्यात आली आहेत. सदर रो हाऊसची घरे बघण्यासाठी अँड. महेंद्र गंडले हे 7 जानेवारी रोजी आपल्या परिवारासह गेले होते. त्यांना येथील घर आवडले. घराची माहिती घेण्यापूर्वीच साईटवरील कर्मचा-याने त्यांना त्यांची जात विचारली. आपण अनुसूचित जातीचे असल्याचे सांगताच कर्मचा-याने त्यांना घराची माहिती देण्यास व घर दाखवण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर त्यांनी बिल्डरचे कार्यालय गाठत विचारणा केली. तेथे देखील त्यांना असाच अनुभव आला.

अखेर अँड. महेंद्र गंडले यांनी चिकलठाणा पोलीस स्टेशन गाठत याप्रकरणी भाईश्री गृपचे मकरंद देशपांडे, सोमाणी, जैन (पूर्ण नाव नाही), बांधकाम साइटवरील कर्मचारी योगेश निमगुडे, सागर गायकवाड व इतर यांच्याविरुद्ध चिकलठाणा पोलिस स्टेशनला अँट्राँसिटीचा गुन्हा नोंद केला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here