एल.एच.पाटील शाळेत लसीकरण

जळगाव (सुमित पाटील) : एल.एच. पाटील वावडदा ता. जळगाव या शाळेत पंधरा वर्षावरील नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण जळके आरोग्य उप केंद्राच्या अंतर्गत उत्साहात झाले. नववीतील रोशनी बारी व आदित्य पाटील या विद्यार्थ्यांनी लस घेत लसीकरणाला सुरुवात केली. यावेळी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

याप्रसंगी सुरुवातीला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासो एल.एच.पाटील यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या लसीकरण केंद्रावर आरोग्यसेवक सलीम भाऊ पिंजारी, ए.सी.पाटील, श्रीमती सुनिता सपकाळे व आशा वर्कर्स सरीता पाटील व जयश्री पाटील यांच्यासह जळके आरोग्य उपकेंद्रातील सहकारी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सौ.जयश्री पाटील यांच्यासह दिपक सराफ, स्वाती, योगेश चव्हाण असे शिक्षकवृंद आणि लिपिक महेंद्र पाटील, भरत पाटील तसेच संदिप पाटील अशा सर्वांचे परिश्रम यावेळी लाभले. लसीकरण यशस्वीतेसाठी कर्मचारी प्रमोद मोरे, विजय पवार, संतोष वाघ,असलम मण्यार व रामचंद्र चव्हाण यांचे देखील सहकार्य लाभले. यावेळी नववी आणि दहावीतील 17 विद्यार्थी व 51 विद्यार्थिनी अशा एकुण 68 जणांनी कोरोनाचे नियम पाळून लसीकरणाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here