मुंबई : जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा ताबा मिळण्यासाठी संस्था विश्वस्तांना धमकावल्याच्या आरोपाखाली सध्या भाजप नेते गिरीश महाजन अडचणीत आले आहेत. मात्र उच्च न्यायालयाकडून त्यांच्यासह त्यांचे स्वीय सचिव रामेश्वर नाईक यांना काही प्रमाणात दिलासा देखील देण्यात आला आहे. 24 जानेवारी पर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई न करण्याचे आदेश खंडपीठाकडून देण्यात आले आहेत.
जानेवारी 2018 या कालावधीत मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे विश्वस्त असलेले अॅड. विजय पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा नंतर पुणे कोथरुड पोलिसात वर्ग करण्यात आला होता. आज बुधवारी न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठासमोर व्हिदिओ कॉन्फरन्सच्या मार्फत सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या बाजूने अॅड. मिलींद साठे यांनी न्यायालयीन कामकाज पाहण्यात आले. तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्यावर कारवाई करु नये असे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत.