जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे तमाशात गोंधळ घालणा-या सर्व सोळा जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तमाशा सुरु असतांना वीज गेल्यानंतर गोंधळ घातल्याचा सोळा जणांवर आरोप लावण्यात आला होता.
डिसेंबर 2014 मध्ये पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे पीर गैबनशहा बाबा यांचा उरुस होता. त्या निमित्त आयोजित तमाशा सुरु असतांना वीज प्रवाह खंडित झाला होता. त्यावेळी स्त्री पुरुष तमाशा कलावंतांना मारहाण झाल्याचा आरोप करत सोळा जणांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सन 2015 पासून सुरु असलेल्या या खटल्याचा निकाल न्या. सिद्दीकी यांच्या न्यायालयात लागला. आरोपींच्या वतीने ॲड.अभय पाटील व ॲड.दीपक पाटील यांनी न्यायालयीन कामकाज पहिले. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. माने यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने सर्व सोळा जणांना निर्दोष मुक्त केले आहे.