मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजन
जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहर शिवसेनेतर्फे भव्य राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धेसाठी तीन पारितोषिके दिली जाणार आहेत. शहरातील माजी शिवसेना महानगरप्रमुख गजानन मालपुरे, युवासेना विस्तारक किशोर भोसले, माजी नगरसेवक चेतन शिरसाळे यांच्यातर्फे या राज्यस्तरीय भव्य चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गजानन मालपुरे (शिवसेना माजी महानगरप्रमुख किशोर भोसले (युवा सेना विस्तारक) चेतन शिरसाळे (मा. नगरसेवक) राहुल नेतलेकर (युवा शिवसैनिक)
“उध्दव ठाकरे” यांचे चित्रण हा स्पर्धेचा विषय आहे. चित्राचा आकार ११ इंच बाय १५ इंच असावा. तयार केलेले चित्र Shivsenajalgaoncity1966@gmail.com या मेल आयडी वर आणि हार्ड कॉपी दुकान नं. 3 शिरसाळे कॉम्प्लेक्स कलाभवन शेजारी सिंधी कॉलनी रोड जळगाव या पत्त्यावर पाठवायची आहे. चित्राच्या उजव्या कोप-याला आपले पूर्ण नाव, वय व मोबाईल नंबर टाकावयाचा आहे. अपूर्ण रंगकाम असलेले चित्र स्पर्धेत समाविष्ट केले जाणार नाही.
चित्र पाठविण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्ट २०२० पर्यंत आहे. स्पर्धेत उत्कष्ट व आकर्षक कलाकृतीस पारितोषिके दिली जाणार आहे. यात प्रथम रु.७००१, द्वितीय रु.५००१ व तृतीय रु. २५०१ अशी पारितोषिके राहणार आहेत.
या स्पर्धेचा निकाल ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता घोषित केला येणार आहे. अधिक माहितीसाठी राहूल नेतलेकर (७०२०२०४४९६) व लोकेश पाटील (९८९०९००५०८) याचेशी या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.