मामाच्या मुलीकडून लग्नाला मिळाला नकार—– आत्महत्येच्या असफल प्रयत्नात भाचा बेजार

jain-advt

अकोला : मामाच्या मुलीवर भाचाचे प्रेम जडले मात्र तिने नकार देताच त्याने किटकनाशक औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मुर्तीजापूर तालुक्यातील या घटनेत भाच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ध्यानीमनी नसतांना आपल्याला लग्नाची मागणी घातल्याचे बघून मामाच्या मुलीने त्याला नकार दिला. तिचे लग्न दुसरीकडे जुळले असतांना त्याने किटकनाशक विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मामाच्या मुलीसोबत काढलेले फोटो त्याने समाजमाध्यमात प्रसारीत करुन ठरलेल्या लग्नात आडकाठी आणल्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध बोरगाव मंजू पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. तसेच पोलिस पाटील रामेश्वर नांदेकर यांनी देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here