नवरीच्या आईच्या मोबाईल व रोख रकमेची पर्स चोरी

जळगाव : मुलीच्या हळद व लग्नाच्या कार्यात नवरीच्या आईचा मोबाईल व रोख रक्कम चोरी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस  स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ. मंगला मुरलीधर सपकाळे यांनी  दिलेल्या फिर्यादीनुसार सदर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शिव कॉलनी येथील रहिवासी सौ. मंगला सपकाळे यांच्या कन्येच्या विवाहानिमीत्त त्यांनी 9 आणि 10 फेब्रुवारी असे दोन दिवस शिरसोली रस्त्यावरील श्रीकृष्ण हॉल बुक केला होता. 9 तारखेला दिवसभराचे कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री अकरा वाजता लॉनमधील रुमवर जात असतांना त्यांच्या मागे एक अनोळखी अल्पवयीन मुलगी येत होती. त्या मुलीने सौ. मंगला सपकाळे यांच्या पाठीवर खाज येण्यासाठी काहीतरी टाकले. पाठीला खाज सुटल्यामुळे हातातील पर्स रुममधील पलंगावर ठेऊन बेसिनजवळ त्या गेल्याची संधी अनोळखी मुलीने साधली. दरम्यान त्या मुलीने त्यांची पर्स गायब केली. त्या पर्समधे मोबाईल व रोख रक्कम असा एकुण तेरा हजार  रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here