अकरा महिन्याचे बाळ सोडून गेलेली विवाहीता बेपत्ता

बुलढाणा : बाळाला कपडे आणायला जाते, असे सांगत घरातून गेलेली विवाहीता बेपत्ता झाली आहे. शेगाव शहरातील ब्राम्हणपुरा परिसरत 10 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी विवाहितेच्या बहिणीने शहर  पोलिसात तकार दाखल केली आहे. वैशाली अनंता ढोके असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे.

बेपत्ता विवाहितेचा वर्ण गोरा व उंची पाच फूट आहे. शरीर बांधा मजबूत, केस लांब व अंगात निळ्या रंगाचा टॉप,  पांढऱ्या रंगाची लॅगीन आहे. अशा वर्णनाच्या महिलेची माहिती मिळाल्यास शेगाव शहर पोलिस स्टेशनला 07265 252010 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here