सोलापुरात दिवसा घरफोडी – 6 तोळे सोने, 24 तोळे चांदी लंपास

सोलापूर : सोलापूर  शहरातील होटगी रस्ता भारतमाता नगरातील रहिवासी शिक्षक दाम्पत्याच्या घरातून सहा तोळे सोन्याचे दागिने आणि चोविस तोळे चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीशैल शिवरुद्र पाटील (रा. भारतमातानगर, विमानतळ शेजारी, होटगी रोड) हे अक्कलकोट तालुक्यातील हत्तीकणबस येथील प्रशाळेत शिक्षक आहेत. त्यांची पत्नी सोलापुरच्या एका शाळेत शिक्षिका आहे. या दाम्पत्याची शाळा शनिवारी सकाळी असते. त्यांच्या गैरहजेरीचा व घर बंद असल्याचा गैरफायदा चोरट्यांनी घेत सोन्या चांदीचे दागीने घरातून भर दिवसा लंपास केले. या दागिन्यांचे मुल्य सुमारे चार लाख रुपये आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here