एकाचा मृत्यु, दोघे जखमी – दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा

जळगाव : भरधाव वेगात ट्रिपलसिट दुचाकी चालवून एकाचा मृत्यू तर चालकासह दुसरा प्रवासी जखमी झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना 23 जानेवारी रोजी रात्री  अकराच्या सुमारास जळगाव – औरंगाबाद रस्त्यावरील कुसुंबा गावानजीक  घडली होती. या घटनेत विनोद जगन्नाथ खांदे (रा. अ‍ॅडम्स केमीकल डी-81 एमआयडिसी जळगाव) हा मयत झाला आहे. करण दारासिंग बागडे (सुप्रिम कॉलनी जळगाव) हा या घटनेतील मोटारसायकल चालक आहे.

मोटार सायकलवरील चालक करण बागडे व दुसरा प्रवासी मिना कालुलाल मिना हे दोघे जखमी झाले होते. हे.कॉ. गफ्फार तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या घटनेप्रकरणी गु.र.न. 106/2022 भा.द.वि. 304(अ), 337, 338 सह मो.वा.का.क. 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक अनीस शेख करत आहेत.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here