कारमधे आढळला पुरुष व महिलेचा आक्षेपार्ह अवस्थेत मृतदेह

औरंगाबाद : बिड बायपास रस्त्यावरील सहारा सिटीच्या मागे निर्जन स्थळी एका कारमधे बुधवारी एका पुरुषाचा व महिलेचा आक्षेपार्ह व जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. भर दुपारी तिन वाजेच्या सुमारास मृतावस्थेत आढळलेल्या दोघांचा चेहरा व खांद्याखालील काही भाग जळालेला दिसून आला. रोहिदास गंगाधर आहेर (48) जवाहर नगर औरंगाबाद आणि शालिनी सुखदेव बनसोडे (38) उल्का नगरी औरंगाबाद अशी मयत असलेल्या दोघांची नावे आहेत. कारमधे किराणा सामानासह सिगारेट पेटवण्याचे लायटर  देखील पोलिसांना आढळून आले.  

कारमधून धुर निघत असल्याचे काही गुराख्यांनी पाहीले. त्यांनी या घटनेची माहिती लागलीच गावक-यांच्या माध्यमातून चिकलठाणा पोलिस स्टेशनला कळवली. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यु झालेला होता. मयत रोहिदास आहेर हे गेल्या काही वर्षापासून शहरातील अथर्व कन्स्ट्रक्शनचे रवींद्र जैन यांच्याकडे चालक म्हणून नोकरीला होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here