नाशिक : मोबाइल चोरी केल्याच्या संशय व त्यातून झालेल्या वादातून हत्या करणा-या तिघा आरोपींना तिन वर्ष सश्रम कारावासाची सजा सुनावण्यात आली आहे. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी या शिक्षेची सुनावणी केली आहे. उल्हास ऊर्फ पिंटू रत्नपारखी, प्रवीण ऊर्फ रवी आठवले (दोघे रा. शरणपूररोड नाशिक), कालिदास खंदारे (रा. सिडको – नाशिक) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.
5 स्प्टेंबर 2018 रोजी कामटवाडा येथे आरोपी चेंबरच्या साफसफाईकामी आले असतांना आरोपी उल्हास रत्नपारखी याचा मोबाईल मयत सदाशिव अर्जुन भगत यांनी चोरल्याचा संशय घेतला. संशय घेतल्यानंतर तिघांनी त्याला मारहाण सुरु केली. या बेदम मारहाणीत भगत मृत्युमुखी पडले. या घटनेप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक आर. एस. शेवाळे यांनी तिघा आरोपींच्या विरुद्ध पुरावे संकलीत करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश वाघवसे यांनी सर्व साक्षी पुराव्यांच्या आधारे आरोपींना तिन वर्षासाठी सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.