अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास एक वर्ष सक्तमजुरी

On: February 20, 2022 4:52 PM

अमरावती : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास अमरावती न्यायालयाने एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. सुनील दिलीपराव अंबाळकर (23), रा. राजापेठ अमरावती असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 7 ऑगस्ट 2016 रोजी सदर घटना घडली होती.

घटनेच्या दिवशी पिडीता रस्त्याने येत असतांना आरोपी सुनिलने तिचा पाठलाग करत तिची छेड काढली होती. पिडीतेने या घटनेची माहिती तिच्या आजोबांना कथन केली होती. याप्रकरणी राजापेठ पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद घेण्यात आली होती. याप्रकरणी दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर न्यायालयीन कामकाजात आठ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली होती. याप्रकरणी पिडीता तिच्या साक्षीवर ठाम राहिली. सर्व साक्षी पुरावे ग्राह्य धरत विशेष अतिरिक्त न्यायमुर्ती एस.जे.काळे यांच्या न्यायालयाने आरोपीस एक वर्षासाठी सश्रम कारावास, एक हजार रुपये द्रव्यदंड, दंड भरला नाही तर एक महिना अतिरिक्त कारावास अशा स्वरुपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील शशी किरण पलोड यांनी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी सतीश चौधरी व अरुण हटवार यांनी कामकाज पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment