अल्पवयीन मुलीवर अत्याचार – आरोपीस दहा वर्षांची शिक्षा

On: February 26, 2022 11:58 AM

यवतमाळ : सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करणा-याला दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. घाटंजी येथील घटनेचा निकाल विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावला आहे. चेतन वैद्य (23) रा. भंडारी ता. घाटंजी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी चेतन वैद्य याने जुन 2018 मध्ये सतरा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीवर जबरीने अत्याचार केला होता. लग्नाचे आमिष दाखवत त्याने पिडीतेसोबत वेळोवेळी संबंध प्रस्थापित केल्याने ती चार महिन्याची गर्भवती राहिली होती. त्यानंतर त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. या घटनेप्रकरणी घाटंजी पोलिस स्टेशनला विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालांतराने पिडीत अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला. डीएनए तपासणीत ते बाळ त्याचेच असल्याचे सिद्ध झाले. विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांच्या न्यायालयात हे प्रकरण सुनावणीसाठी आले. एकुण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षी, पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी चेतन वैद्य यास दहा वर्ष सक्तमजुरीसह दहा हजार रुपयांचा दंड सुनावला. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment