अल्पवयीन मुलीवर अत्याचार – आरोपीस अटक

जळगाव : अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिला गुंगीचे औषध मिश्रीत पाणी पिण्यास देत तिच्यावर जबरीने अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. साबीर शेख जहुर (26) रा. इंदीरा नगर शिरसोली असे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. पिडीतेने सामान्य रुग्णालयात दाखल असतांना उपचारादरम्यान दिलेल्या जवाबाच्या आधारे साबीर शेख जहुर याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या पाच ते सहा महिन्यापुर्वी मिस्तरी काम करणा-या साबीरने आपल्याला त्याच्या घरी बोलावून गुंगीचे औषध असलेले पाणी पिण्यास दिले होते असे पिडीतेने म्हटले आहे. गुंगी आल्यानंतर साबीरने आपल्यावर अत्याचार केला असल्याचे पिडीतेने जवाबात पुढे म्हटले आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्याप्रकरणी संशयीत साबीर यास अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे व सचिन मुंडे पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here