जळगाव : युक्रेन येथून पाचोरा शहरात सुखरुप आलेया विद्यार्थ्याचे पाचोरा तालुका कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी स्वागत केले. सुरज शिंदे असे युक्रेन येथून पाचोरा येथे परत आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पाचोरा तालुक्यातील मोढांळा येथील सेवानिवृत्त सैनिक रविंद्र शिंदे यांचा सुरज शिंदे हा चिरंजीव आहे. तो एमबीबीएसच्या दुस-या वर्षाचे शिक्षण युक्रेन येथे घेत आहे. सद्यस्थितीत रशिया – युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धजन्य परिस्थितीत हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेन येथे अडकून पडले असून ते भारतात येण्याच्या मनस्थितीत आहेत. युक्रेन येथून भारतासाठी सुटलेल्या सहाव्या विमानाने सुरज शिंदे मायदेशी परत आला आहे. विमानतळावर पोहोचण्यासाठी सुमारे आठ कि.मी. अंतर त्याने शुन्य तपमानात पायी चालत गाठले होते. मुंबई विमानतळानंतर रेल्वेने पाचोरा रेल्वे स्थानकावर आलेल्या सुरजच्या स्वागतासाठी त्याचे वडील रविंद्र शिंदे, आई तसेच पाचोरा तालुका कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवदास पाटील, बाळू पाटील, राहुल शिंदे, रवी सुरवाडे, सतिश वाकडे आदी उपस्थित होते.