अकोट : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी शिक्षक जयंत श्रीकृष्ण वावगे (42) रा. नयाप्रेस यास सहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि 25 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी सदर निकाल दिला आहे.
आरोपी शिक्षक जयंत वावगे याने दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्याला बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 9 फ सह 10 या कलमानुसार शिक्षेस पात्र ठरवण्यात आले आहे. आरोपीने दंडाची रक्कम भरली नाही तर दोन वर्षांचा अतिरिक्त कारावास पुर्ण करायचा आहे. 15 सप्टेबर रोजी जयंत वावगे याच्याविरोधात पिडीतेच्या आईने अकोट शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार सदर गुन्ह्याची नोंद घेण्यात आली होती. तत्कालीन तपास अधिकारी महेंद्र गवई यांनी गुन्ह्याचा तपास केला. पैरवी अधिकारी एएसआय मोहन फरकाडे यांनी सहकार्य केले.