पाचोरा येथे शिंगाडा मोर्चा काढण्याचा कॉंग्रेसचा इशारा

जळगाव : शेतकऱ्यांना अनुदानासह धान्य पुरवठा तातडीने होण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने शिंगाडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली 21 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता आठवडे बाजारातून हा मोर्चा काढला जाणार आहे.

पाचोरा शहरातील स्वस्त धान्य दुकानातून जानेवारी 2022 च्या मोफत धान्याचे वितरण अद्याप झालेले नाही. पाचोरा शहरात सुमारे 2200 कुटूंब दारिद्र रेषेखाली आहेत. मात्र केवळ चार हजार कुटूंबांनाच या धान्याचा लाभ मिळतो. गेल्या सुमारे विस वर्षापासून बीपीएल रेशनकार्ड धारकांवर हा अन्याय आहे. या कुटुंबाना तातडीने बीपीएल यादीत समाविष्ट करुन त्यांच्यावरील अन्याय दुर करुन चौकशी होण्याची मागणी करण्यात आली आहे. विधवा परीतक्त्या, दिव्यांग, अनाथ यांना बीपीएल यादीत समाविष्ट करावे यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार कैलास चावडे यांना देण्यात आले. यावेळी पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अ‍ॅड. अमजद पठाण, राजेंद्र महाजन, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. अंबादास गिरी, संगिता नेवे, कुसुम पाटील, अ‍ॅड मनिषा पवार, अ‍ॅड. वसिम बागवान, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, युसूफ टकारी, प्रदीप चौधरी, कल्पना निंबाळकर, स्मिता कासार, राहुल शिंदे, गणेश पाटील, कल्पेश येवले आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here