अकोला : चॉकलेटच्या आमिषाने जवळ बोलावून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अकोला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत तिन वर्ष सश्रम कारावासाची सजा सुनावली आहे. गोवर्धन बळीराम नंदागवळी (45) रा. नवरंगपूर रामटेक, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
मुर्तीजापूर तालुक्यातील माना पोलिस स्टेशनला यापक्ररणी 15 सप्टेबर 2015 रोजी आरोपीविरुद्ध भा.द.वि. 354 आणि पोस्को कायद्यच्या कलम 11 व 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायमुर्ती एस. पी. गोगरकर यांच्या न्यायालयाने आरोपीला पोस्को कायदयाचे कलम 11, 12 तसेच भा.द.वि. 354 नुसार दोषी ठरवत तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच पाच हजार रुपयांचा दंड अशा स्वरुपाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा आरोपीने भोगायची आहे. अतिरिक्त सरकारी वकील अॅड. शाम खोटरे यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली. पोलिस उपनिरीक्षक विल्लेकर व पोलिस कर्मचारी सोनू आडे यांनी गुन्ह्याचा तपास पुर्ण केला.