अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीस दहा वर्ष कारावास

अंबाजोगाई : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशोक मारुती सरवदे (रा. साबळा, ता. केज) असे अप्पर सत्र न्यायाधीश सुप्रिया सापटनेकर यांनी शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अशोक मारुती सरवदे याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत साबळा येथून पळवून नेले होते. त्याच्याविरुद्ध केज पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने जामीन केल्यानंतर त्याने पुन्हा पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेले होते. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असून तसेच तो विवाहीत व दोन मुलांचा पिता असतांना देखील त्याने तिच्यावर बलात्कार केला होता.

याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड. अशोक कुलकर्णी यांनी न्यायालयीन कामकाजात सहा साक्षीदार तपासले. आरोपी विरुद्ध न्यायालयात ठोस पुरावे सादर करण्यात आले. न्यायालयात सादर करण्यात आलेले साक्षीपुरावे, सरकारी वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीस दहा वर्ष व सात वर्ष अशा दोन्ही सक्तमजुरीची शिक्षा तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. अशोक कुलकर्णी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. त्यांना अ‍ॅड. आर. एम. ढेले, अ‍ॅड. नितीन पुजदेकर यांनी मदत केली. पोलिस पैरवी म्हणून बाबूराव सोडगिर, शिवाजी सोनटक्के यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here