जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पुर्व परिक्षा 2021 ही परिक्षा 3 एप्रिल 2022 रोजी जळगाव शहरातील एकुण 26 उप केंद्रांवर परिक्षा घेतली जाणार आहे. सकाळी अकरा ते दुपारी बारा अशी या परिक्षेची वेळ आहे.
या परिक्षा कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याकामी जिल्हाधिका-यांनी आदेश जारी केले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (1)(2) व (3) खाली प्रदान केलेल्या अधिकारानुसार या कालावधीत पेपर सुरु झाल्यापासून ते संपेपर्यतच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील सर्व परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कुही प्रवेश करु नये. हा आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांना लागु होणार नाही. परिक्षा केंद्रानजीकच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक पेपर सुरु असलेल्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत असे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत.