तरुणाची हत्या अनैतिक संबंधातून? संशयीत पोलिसांच्या ताब्यात

On: March 26, 2022 12:58 PM

जळगाव : चाकूने हल्ला करत खून केल्याच्या संशयातून रामानंद नगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. अमित नारायण खरे रा. समता नगर जळगाव असे पोलिसांच्या ताब्यातील संशयीत आरोपीचे नाव असल्याचे समजते. सागर नरेंद्र पवार रा. समता नगर जळगव असे चाकू हल्ल्यात जखमी व उपचारादरम्यान मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मयत सागर नरेद्र पवार याचे एका विवाहितेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय अमित खरे यास होता. ते संबंध अमित खरे यास मान्य नव्हते. त्यातून हा हत्येचा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. चोवीस तासाच्या आत रामानंद नगर पोलिसांच्या शोध पथकाने संशयीतास ताब्यात घेतले असून पुढील तपास व चौकशी सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment