जालन्यात महिला पोलिस लाचेच्या सापळ्यात

जालना : देशी दारुची वाहतुक बिनबोभाट सुरु ठेवण्याच्या बदल्यात देशी दारु दुकानदाराकडून दरमहा साडेपाच हजार रुपयांची लाच मागणा-या व तेवढ्याच रकमेची लाच स्विकारणा-या महिला पोलिस कर्मचा-यास एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. सुनिता कांबळे असे एसीबीच्या सापळ्यात अडकलेल्या कदीम जालना पोलिस स्टेशनला कार्यरत पोलिस नाईक महिलेचे नाव आहे. तसेच या प्रकरणी सहभाग असलेल्या रत्नपारखे या कर्मचा-यास सहआरोपी करण्यात आले आहे. जालना येथील मस्तगड चौकीत एसीबीची सदर कारवाई झाली.  

लाचखोरीच्या या प्रकरणातील दोघांनी काही दिवसांपुर्वी पकडलेली दारु आपसात व्यवहार करुन सोडून दिली होती. मात्र दारुची वाहतुक बिनबोभाट सुरु ठेवायची असल्यास दरमहा साडेपाच हजार रुपयांची लाच द्यावी लागेल असे दोघांनी संबंधीत तक्रारदार दारु व्यावसायीकास बजावले होते. मात्र दारु व्यावसायीकाची लाच देण्याची तयारी नव्हती. त्यामुळे त्याने एसीबीकडे तक्रार दाखल केली. कारवाई दरम्यान ड्युटीवर हजर असलेली महिला कर्मचारी एसीबीच्या हाती आली तर सुटीवर असलेला कर्मचारी रत्नपारखे हा हाती आला नाही. डिवायएसपी सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एम. शेख, ज्ञानदेव जुंबड आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here