गर्भवती पत्नीचा खून करणा-यास जन्मठेप

On: March 26, 2022 6:44 PM

जालना : चारित्र्याच्या संशयातून गर्भवती पत्नीची हत्या करणाऱ्यास आरोपी पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चामरिया बदिया बारेला (27) रा. शिवल, ता. नेपाननगर, जि. बऱ्हाणपूर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जाफराबाद तालुक्यातील गारखेडा येथील मारुती संपत कळंबे यांच्या शेतात आरोपी चामरिया हा त्याच्या पत्नीसोबत सालगडी म्हणून कामाला होता. 4 जानेवारी 2021 रोजी गर्भवती पत्नी संगीताच्या चारित्र्यावर त्याने संशय घेत तिला काठीने मारहाण केली होती. या मारहाणीत ती ठार झाली होती.

शेतमालकाच्या फिर्यादीनुसार जाफराबाद पोलिस स्टेशनला हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या घटनेचा तपास तत्कालीन पो.नि.अभिजित मोरे यांनी केला. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने या प्रकरणी एकूण अकरा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने दिलेला तर्फे पुरावा आणि युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment