खूनाच्या गुन्हयातील संशयीत एलसीबी पथकाने केला जेरबंद

On: March 26, 2022 10:05 PM

जळगाव : शिवाजीनगर हुडको परिसरातील तरुणाचा आज 26 मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खून झाल्याचे उघडकीस आले. या खूनातील संशयीत आरोपीस एलसीबी पथकाने काही तासातच ताब्यात घेत अटक केली आहे. नरेश आनंदा सोनवणे (रा. इंद्रप्रस्थ नगर जळगाव) असे हत्या झालेल्या तर आकाश सखाराम सोनवणे (रा. शिवाजी नगर जळगाव) असे हत्येचा आरोप असलेल्या संशयीत तरुणाचे नाव आहे. संशयीत आकाश यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 76/22 भा.द.वि. 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि. किरणकुमार बकाले यांचे पथक समांतर तपास करत होते. तपासादरम्यान सफौ अशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, पोना प्रितम पाटील आदींच्या पथकाने संशयीत आकाश सखाराम सोनवणे यास गेंदालाल मिलच्या गेट क्रमांक एक परिसरातून ताब्यात घेत अटक केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment