जळगाव : दोन वर्षापुर्वी हिसकावून नेलेल्या मोबाईलप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात एलसीबी पथकाने तिघांना अटक केली आहे. यातील दोघे मोबाईल चोरटे असून एक मोबाईल खरेदी करणारा आहे. निकेश मधुकर वानखेडे (23) रा. कंडारी, भुसावळ, सचिन मनोज जाधव (19) रा.पाळधी ता.जामनेर अशी मोबाईल चोरट्यांची तर तो खरेदी करणारा सिध्दांत अरुण म्हस्के (25) पिओएच कॉलनी आरबी वन 1162 ई ब्लॉक कंडारी भुसावळ अशी तिघांची नावे आहेत.
तिघांना भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. भुसावळ शहर पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा दोन वर्षानंतर उघडकीस आला आहे. पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. अमोल देवढे सफौ अशोक महाजन, पो.हे.कॉ. सुनिल दामोदरे, लक्ष्मण पाटील, पोना किशोर राठोड, पोना रणजीत जाधव, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोकाँ. विनोद पाटील, चा.पो.कॉ. मुरलीधर बारी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.