एसटी कर्मचा-याने संपवली जीवनयात्रा

जळगाव : माझी मनस्थिती खराब असल्यामुळे मी टोकाचे पाऊल उचलत असून माझ्या आत्महत्येशी माझ्या कुटूंबाचा कुठलाही संबंध नाही असा उल्लेख करत एसटी कर्मचा-याने आपली जीवनयात्रा संपुष्टात आणल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचा-यांमधे खळबळ माजली आहे.

जळगाव शहरातून जाणा-या शिवाजी नगर नजीक रेल्वे लाईनच्या डाउन मार्गावर धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत एस टी कर्मचा-याने आज सकाळी आत्महत्या केली. शिवाजी पाटील असे आत्महत्या करणा-या कर्मचा-याचे नाव त्याच्या खिशातील डायरीवरुन निष्पन्न झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस स्टेशन आणि आरपीएफ कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी पुढील कारवाई सुरु केली. शव विच्छेदनकामी मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here