अनैतीक संबंधात अडथळा – केले शरीराचे दोन तुकडे

औरंगाबाद : कंबरेपासून फक्त वरचा भाग असलेले एक शव कन्नड तालुक्यातील दहेगाव शिवारात 26 मार्च रोजी आढळून आले होते. 48 तासात या शवाची ओळख पटवण्यात पिशोर पोलिसांना यश आले आहे. तसेच या खूनाचा उलगडा करुन दोघा संशयीत आरोपींना अटक देखील करण्यात आली. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे तरुणास ठार केल्याचे दोघा संशयीतांनी कबुल केले आहे. संदीप बाळा मोकासे (35) रा.पिशोर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पिशोर येथील शफेपूर परिसरातील संदीप बाळा मोकासे हा गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांना समजले होते. त्या दृष्टीकोनातून देखील तपास करण्यात आला होता. बेपत्ता संदीपच्या शेतात बारकाईने पाहणी केली असता पोटाच्या आतडीचा काही भाग तेथे आढळून आला. मयत हा संदीप मोकासे असण्याची दाट शक्यता पोलिस पथकाला होती. मृतदेहाच्या अंगावरील कपडे नातेवाइकांना दाखविले असता ते संदीपच्या नातेवाईकांनी ओळखले. मयत हा संदीप मोकासे असल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले. मयतास कुणी व कशासाठी मारले याबाबत गुप्त तपास केला असता त्याच्या पत्नीचे गावातील सुनील सावजी हरणकाळ व शशिकांत उर्फ नारायण मोकासे यांच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पुढे आली.

संदीप अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने गळा कापून त्याला ठार करण्यात आले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतून त्याचे कंबरेपासून दोन तुकडे करण्यात आले होते. मयताच्या शरीराचा वरील भाग प्लास्टिक बॅगेत भरुन तो पांढऱ्या पोत्यात टाकण्यात आला होता. ते पोते दहिगाव शिवारात टाकण्यात आले. शरीराचा खालचा भाग घटनास्थळापासून जवळ असलेल्या एका विहिरीत टाकण्यात आल्याची कबुली अटकेतील दोघांनी पोलिसांना दिली. विहिरीतून पांढऱ्या रंगाची दगड बांधलेले पोते वर काढण्यात आले. या पोत्यात मयताचा कंबरेपासून खालचा कुजलेला भाग मिळाला.

अटकेतील दोघा संशयीतांना न्यायालयासमक्ष हजर केले असता 1 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. स.पो.नि. कोमल शिंदे, पोलिस उप – निरीक्षक विजय आहेर, एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव यांच्यासह  सहायक फौजदार सोनाजी तुपे, माधव जरारे, पोहेकॉ. गंगाधर भताने, सुनील भिवसने, पोना. विलास सोनवणे, किरण गंडे, वसंत पाटील, सोपान डकले, गजानन क-हाळे, लालचंद नागलोत, दिनेश खेडकर, ईश्वर उसारे, दीपक सोनवणे, गणेश कवाळ, कल्याणसिंग बहुरे, सुवर्णा पठाडे, रेणुका मालोदे आदींनी या  तपासात सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here