जळगाव : बहिणीने भावाकडे सांभाळण्यासाठी दिलेल्या सोन्याच्या दागीन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील नवीपेठ भागातील रहिवासी राजु गोविंद अग्रवाल हे मोबईल रिपेअरिंगचे काम करतात. त्यांची बहिण सुरेखा भावसार यांना विदेशात मुलाकडे जायचे असल्यामुळे त्यांनी आपले सोन्याचे दागिने भाऊ राजु अग्रवाल यांच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते.
त्यानंतर ते 24 मार्च रोजी पुणे येथे मुलाकडे गेले. राजु अग्रवाल यांच्या गैरहजेरीत त्यांच्या घराच्या लोखंडी खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून अज्ञात चोरट्यांनी मंगळसुत्र, नेकलेस, मोतीहार, कानातले, सोन्याचे तुकडे, 2 अंगठी, 3 सोन्याचे शिक्के, चेन असा सुमारे तिस तोळे वजनाचा सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाला आणि 8 हजार रुपये रोख चोरुन नेला.
बुधवारच्या दिवशी अग्रवाल आपल्या परिवारासह घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय ठाकुरवाड, पोलिस उप निरीक्षक जगदीश मोरे, सर्जेराव क्षीरसागर, कर्मचारी योगेश बोरसे, योगेश पाटील, रतन गिते, तेजस मराठे, प्रणेश ठाकूर, अक्रम शेख, संजय हिवरकर, मोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंग पाटील, राजेश मेढे, अविनाश देवरे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.