घाटंजी कृ. उ. बा. स. संचालक अपात्रतेप्रकरणी सुनावणीकडे लक्ष

On: August 24, 2025 7:57 PM

यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक अपात्रतेप्रकरणी होणा-या सुनावणीकडे संबंधीत राजकीय व्यक्तींचे लक्ष लागून आहे. घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे व आशिष सुरेशबाबू लोणकर यांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांच्या न्यायालयाने अपात्र घोषित केले होते. या आदेशाविरुद्ध दोघा संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेत आवाहन याचीका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. एस. जवळकर यांनी हा आदेश यापुर्वी खारीज केला आहे. तसेच दोघा संचालकांना मुळ कार्यालयात संचालक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे.

याप्रकरणी मिळालेल्या आदेशाला स्थगिती मिळण्याकामी सभापती नितीन कोठारी यांनी वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आठ आठवड्यात याबाबत उत्तर सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवादींना दिले आहे. पुढील सुनावणी २५ ऑगस्ट २०२५ रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचिकाकर्ता नितीन कोठारी यांच्या वतीने ॲड. अरधेंतु माउली प्रसाद, ॲड. अनुराग घरोटे, प्रतिवादी अभिषेक ठाकरे यांच्या वतीने ॲड. सत्यजित देसाई, ॲड. सिद्धार्थ गौतम, ॲड. अनघा देसाई यांनी, याचिकाकर्ता आशिष लोणकर यांची बाजू उच्च न्यायालयाचे वरिष्ठ ॲड. सुनील मनोहर, ॲड. वाय. एन. सांबरे यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment