नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या परिवाराच्या ताब्यातील नवी दिल्ली येथील शासकीय बंगला बळाचा वापर करुन रिकामा करण्यात आला आहे. सदर बंगला रिकामा करण्यासाठी तिन दिवसांचा कालावधी लागला.
सन 1990 मधे विश्वनाथ प्रताप सिंह याच्या शासन काळात पासवान कामगार मंत्री असतांना त्यांना हा बंगला राहण्यासाठी देण्यात आला होता. सन 2020 मधे पासवान यांचे निधन झाल्यानंतर हा बंगला त्यांच्या परिवाराच्या ताब्यातच होता. हा बंगला केंद्रीय रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नावे वाटप करण्यात आला आहे. रामशंकर कठेरिया आणि पी. सी. सारंगी या दोन माजी मंत्र्यांचे बंगले देखील अशाच पद्धतीने बळाचा वापर करुन रिकामे करण्यात आले आहे.