जळगाव पोलीस दलातर्फे “तरंग स्नेह मेळावा”

जळगाव : “चला हवा येवू द्या” या मालीकेचे लोकप्रिय कलाकार कुशल बद्रीके, सागर कारंडे, भाऊ कदम, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे तसेच सुप्रसिध्द पार्श्वगायिका वैशाली माडे या सर्व कलावंतांना जळगाव पोलिस दलातर्फे एकाच व्यासपिठावर आणले जात आहे.

पोलिस कल्याण निधी संकलनासाठी पोलिस मुख्यालयाच्या पोलिस कवायत मैदानावर 3 एप्रिल रोजी सायंकाळी साडे सहा ते साडे नऊ या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस कल्याण निधी संकलनकामी मदत करणा-या सर्व सन्माननीय विशेष आमंत्रितांसह पोलीस कुटुंबीयांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी केले आहे.सदर कार्यक्रमास जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जळगाव शहर महानगरपलीकेच्या महापौर जयश्री महाजन व इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here