भगवान महावीर जयंतीनिमित्त सद्भभावना रॅली उत्साहात

जळगाव : भगवान महावीर यांच्या 2621व्या जयंती महोत्सवानिमीत्त सकल जैन श्री संघ जळगाव द्वारा आयोजीत सद्भावना रॅलीचे 11 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला.सदर रॅली जळगाव शहरातील महाबळ संभाजी नाट्य गृहापासून सुरु करण्यात आली होती. आकाशवाणी चौक, मध्यवर्ती बस स्थानक, नेहरु चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे जी.एस. मैदानावर या रॅलीचा समारोप झाला.

जे.पी.पी. अहिंसा रिसर्च फाऊंडेशन यांनी या रॅलीचे नियोजन केले होते. सकल जैन श्री संघ जळगाव, श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती जळगाव यांनी आयोजीत केलेल्या या रॅलीला भरभरुन प्रतिसाद मिळाला. शंकरलालजी कांकरीया, स्वरुपजी लुंकड, रुपेशजी लुंकड, तेजस कावडीया, किशोर भंडारी, मनिष लुंकड, ममता कांकरीया, सचिन चोरडीया, विजय खिवंसरा, विजय खिवंसरा, जितेंद्र छाजेड, संतोष कोचर यांनी रॅलीची सुरुवात केली. या रॅलीत आनंद चांदीवाल, विशाल चोरडीया, अजित कोठारी, सारिका कटारिया, ललिता श्रीश्रीमाळ, अनिता मेहता, रिटा कांकरिया, संजय कांकरिया, संतोष सुराणा, सुशील बालिका मंडळाच्या सर्व सदस्य आदींचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here