जळगावला तिहेरी अपघातात तिघे जखमी

जळगाव : जळगाव शहरापासून नजीक असलेल्या शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅली परिसरात तिन वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातात तिघे जण जबर जखमी झाले आहेत.

तिघा जखमींना तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातात मारुती सुझुकी कंपनीची इको कार (एमएच 12 टीएच 2295), रिक्षा (एमएच 19 व्ही 5583) आणि एक मोटार सायकल अपघातग्रस्त झाले आहेत. या अपघातात दुचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. तिघा जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांंचे पथक पोहोचले असून पुढील मदत सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here