आयपीएल मॅच सट्ट्यावरील धाडीत तिघे ताब्यात

जळगाव : पंजाब विरुद्ध हैद्राबाद या आयपीएल मॅचवर सुरु असलेल्या सट्ट्यावरील धाडीत तिघांना जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. इम्रान खान अमीन खान (40) रा. चिखली, जि. बुलढाणा ह.मु. फातेमा नगर, एमआयडीसी जळगाव, सैय्यद वसीम सैय्यद कमरोद्यीन (38) रा. फातेमा नगर, एमआयडीसी जळगाव आणि जावेद शेख नबी शेख (30) रा. फातेमा नगर एमआयडीसी जळगाव अशी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यातील तिघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 40 हजार 600 रुपये रोख तसेच मोबाईल, टीव्ही व इतर साहित्या असा एकुण 95 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

एमआयडीसी परिसरातील फातेमा नगर परिसरात असलेल्या आयेशा किराणा दुकानासमोर पंजाब विरुद्ध हैद्राबाद या आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे धडक कारवाई करण्यात आली. तिघांविरुद्ध पोलिस नाईक रविंद्र मोतीराया यांच्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. क्रिकेट लाईन गुरु या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून हा जुगार सुरु होता. सहा पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शानाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. इम्रान सैय्य्द, पो.ना.सचिन पाटील, पो.ना. योगेश बारी तसेच जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे स.पो.नि. किशोर पवार, हे.कॉ. मीनल साकळीकर, पोलिस नाईक महेश महाले, पोलिस नाईक रविंद्र मोतीराया आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास इमरान सैय्यद करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here