अल्पवयीन मुलीवरील अत्याचार शवविच्छेदनानंतर उघड

धुळे : शिरपूर तालुक्यातील चाकडू या गावी मावसभावाकडून अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार तिच्या शव विच्छेदनानंतर उघड झाला आहे. मावसभावाकडून गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीने विषारी औषध सेवन करुन आपली जीवनयात्रा 13 एप्रिल रोजी संपवली होती. या प्रकरणी सोमनाथ पावरा या संशयीतास अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. 

मावसभावाकडून गर्भवती राहिलेल्या सोळा वर्षाच्या मुलीने विषारी औषध सेवन केल्यानंतर तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचे निधन झाले. शव विच्छेदनादरम्यान ती गर्भवती असल्याचे उघड झाले. तिच्या मोबाईलचे कॉल डीटेल्स पोलिसांनी तपासले  असता त्यात सोमनाथ भोज्या पावरा (रा. टेकवाडे ता. शिरपूर) हा संपर्कात रहात असल्याचे निष्पन्न झाले. त्याला चौकशीकामी ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी शिरपुर तालुका पोलिस स्टेशनला सोमनाथ पावरा याच्याविरुद्ध बलात्कार, आत्महत्येला प्रवृत्त करणे, बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस अधिकारी सुरेश शिरसाठ  करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here