जळगावचे कनेक्शन जालना शहरात पकडलेल्या गुटख्याशी

जालना : जालना शहराच्या नवीन मोंढा परिसरात एलसीबीने पकडलेल्या गुटख्याचे जळगाव कनेक्शन उघड झाले आहे. या वाहनाचा मुळ मालक हा जळगाव येथील असल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून जालना पोलिसांचे पथक त्या वाहन मालकाच्या मागावर आहे.

जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. सुभाष भुजंग व त्यांच्या पथकाने 8 एप्रील रोजी जालना शहरात 18 लाख रुपयांच्या गुटखा वाहनासह पकडला होता. तो गुटखा साठा आणि जप्त वाहन चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चंदनझिरा पोलिसांच्या अधिक तपासात पकडण्यात आलेल्या वाहनाचा मुळ मालक जळगाव येथील असल्याचे उघड झाले आहे. टाटा कंपनीच्या वाहनासह चालक संतोष पाटील यास चंदनझिरा पोलिसांनी अधिक तपासकामी आपल्या ताब्यात घेतले होते. पुढील तपास चंदनझिरा पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक गणेश झलवार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here