जळगाव : चाळीसगाव ग्रामीण आणि शहर वाहतुक शाखा यांच्या संयुक्त नाकाबंदी व मोटार वाहन कारवाई दरम्यान लाखो रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. 8 लाख 73 हजार रुपये किंमतीचा गांजा, चारचाकी वाहन, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण 13 लाख 36 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गांजाची वाहतुक करणा-या तुषार अरुण काटकर (28) रा. दत्तवाडी, चाळीसगांव आणि सुनिल देविदास बेडीस्कर (38) रा. पिलखोड, ता. चाळीसगांव मुळ गांव बाळद, ता. भडगाव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
18 एप्रिल 2022 रोजी चाळीसगाव ग्रामीण व शहर वाहतुक शाखा यांच्या संयुक्त कारवाईत विना क्रमांकांच्या वाहनांवर कारवाई सत्र सुरु होते. दरम्यान धुळे बायपास रस्त्यावर हॉटेल विराम गार्डनच्या समोर सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास धुळे शहराकडून चाळीसगांवकडे एक पांढऱ्या रंगाचे स्कार्पिओ वाहन आले. या वाहनाला नंबर प्लेट नव्हती. या वाहनावर पोलिस पथकाला संशय आल्याने ते थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. त्यात 8 लाख 73 हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. याप्रकरणी चाळीसगांव शहर वाहतुक शाखेचे सपोनि तुषार मुरलीधर देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट 8C, 20 (ii) नुसार चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेगें, सपोनि रमेश चव्हाण, पोना शांताराम सिताराम पवार, पोना गोवर्धन राजेंद्र बोरसे, पोना ज्ञानेश्वर काशिनाथ बडगुजर, पोना देविदास संतोष पाटील, पोना दिनेश विक्रम पाटील, पोना प्रेमसिंग नरसिंग राठोड व चालक सफौ अनिल आगोणे तसेच चाळीसगांव शहर वाहतुक शाखेचे स.पो.नि. तुषार मुरलीधर देवरे, पोहेकॉ श्रीराम पोपट बोरसे, पोना सचिन देविदास अडावदकर, पोना बापू काशिनाथ पाटील, पोना दिपक पितांबर पाटील, पोना नरेंद्र महादू पाटील, चालक पोहेकॉ रावसाहेब नामदेव पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्ष संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना शांताराम पवार करत आहेत.