पोलिसावर हल्ला करणा-या टोळक्याविरुद्ध गुन्हा

नाशिक (हरिभाऊ बळी – दौंड प्रतिनिधी) : रस्त्यात सुरु असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसासह त्याच्या साथीदारांवर टोळक्याने हल्ला केला होता. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिस कर्मचारी दत्तात्रय शिंदे यांनी गुन्हा दाखल केला आहे. 18 एप्रिल रोजी पाटस हद्दीत जुनी इरिगेशन कॉलनीसमोर सायंकाळच्या वेळी सदर घटना घडली होती.

पाटस गावाच्या रस्त्यावर विजय क्षत्रीय, जॉकी पानसरे, बिटट् पानसरे असे आपसात भांडण करत होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी दत्तात्रय उत्तम शिंदे (30) रा. डी.एस.के.रानवारा कांचन रो हाऊस बावधन पुणे हे आपल्या काही सोबत्यांसोबत तेथून जात होते. सुरु असलेला वाद सोडवण्यासाठी पो.कॉ.दत्तात्रय शिंदे त्याठिकाणी गेले. वाद सोडवण्यासाठी आलेल्या शिंदे यांच्यावर या टोळक्याने हल्ला चढवला. आपण पोलिस असल्याचे सांगून देखील या टोळक्याने पोलिस कर्मचारी दत्तात्रय शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्या सर्वांवर लाकडी दांडक्याने मारहाण सुरु ठेवली. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाचे दगडाने नुकसान केले. डोक्यात दगड घालून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात शिंदे व त्यांचे सोबती जखमी झाले. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here