केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सुधारीत जळगाव दौरा

जळगाव : केंद्रीय मंत्री (वाहतुक व रस्ते) नितीन गडकरी हे 22 एप्रिल रोजी जळगाव दौ-यावर येत आहेत. त्यांच्या जळगाव दौ-यात काही बदल झाला आहे. तो बदल पुढीलप्रमाणे आहे.

दुपारी 3.30 वाजता धुळे येथून विशेष विमानाने जळगावकडे प्रयाण, दुपारी 4.10 वाजता जळगाव विमानतळवर आगमन व त्यानंतर प्रेसीडेंट कॉटेज रिसॉर्ट एमआयडीसी जळगावकडे प्रयाण, दुपारी 4.20 ते 5 वाजेपर्यंत राखीव, सायंकाळी 5 ते 5.30 पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या जळगाव कार्यकर्त्यांसमवेत संवाद, स्थळ हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज रिसॉर्ट एमआयडीसी जळगाव, 5.45 ते 6.45 जळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा, स्थळ – जी.एस. मैदान जळगाव. सायंकाळी 7.15 वाजता जळगाव विमानतळ येथून विशेष विमानाने नागपूरकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here