ऑन ड्युटी मद्यधुंद प्रशिक्षणार्थी पोलिसाविरुद्ध गुन्हा

धुळे : धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात ऑन ड्यूटी मद्यधुंद प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी आढळून आला. त्याच्याविरुद्ध शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन कानडे असे गुन्हा दाखल झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलिसाचे नाव असून, तो मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे.

येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात 530 पोलिस कर्मचारी सध्या प्रशिक्षण घेत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचा यामधे समावेश आहे. गुन्हा दाखल झालेला कर्मचारी सचिन सुर्यभान कानडे(26) हा मुळचा बीड येथील रहिवासी असून मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे. तो ड्युटीवर असतांना मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने राखीव पोलिस निरीक्षक पांडुरंग माधवराव डधळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार धुळे शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here