मंत्री गडकरींच्या हस्ते एकाच रस्त्यासाठी तिस-यांदा कार्यक्रम

On: April 22, 2022 11:42 AM

पैठण : पैठण – औरंगाबाद चौपदरी रस्त्याचे 24 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भुमीपुजन होत आहे. सन 2014 मधे तत्कालीन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा उद्घाटन कार्यक्रम झाला होता. त्यानंतर पुन्हा सन 2016 मधे याच पैठण – औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम झाला होता.

त्यानंतर पुन्हा आता 24 एप्रिल 2022 रोजी तिस-यांदा याच रस्त्यासाठी भुमीपुजन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. अशाप्रकारे एकाच रस्त्यासाठी तिस-यांदा कार्यक्रम होत असल्यामुळे हा एक चर्चेचा विषय झाला आहे. या रस्त्याच्या कामाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश होऊन प्रत्यक्षात चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या प्रक्रियेनंतर टेंडर निघेल. दिवाळीनंतर टेंडर निघाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment