गळफास घेत तरुणाने संपवली जीवनयात्रा

जळगाव : जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. धनंजय चंद्रजीत बाविस्कर (25) असे गळफास घेणा-या कुसुंबा येथील तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री आपल्या राहत्या घरी धनंजय बाविस्कर याने गळफास घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी त्यास सामान्य रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिका-यांनी धनंजय यास मयत घोषित केले. त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. निवासी वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या खबरीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. महेंद्र गायकवाड तसेच पो.कॉ. नरसिंग पाडवी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here